बलदंड-बेलाग किल्ले धोड़प- Dhodap Fort
किल्ले धोड़प- हा महाराष्ट्रातील दूसरा सागळ्यात उंच किल्ला. उंच क़िल्ल्याचा मान हा साल्हेर क़िल्ल्याचा आहे. योगायोगाने दोन्ही किल्ले हे नाशीक जील्हयातच आहेत. नाशीक मधल्या कळवण तालूक्यात धोड़प किल्ला येतो. धोड़पची उंची समुद्र सपाटी पासुन ४८२९ फूट आहे. नाशीक मध्ये त्र्यंबकेश्वर, सातमाळ आणी बागलाण या सह्याद्रीच्या मुख्य डोंगररांगा व अजंठा-सातमाळ, बालाघाट या उपडोंगररांगा आहेत. त्यापैकि अजंठा-सातमाळ डोंगररांगेत हा किल्ला वसला आहे. या रांगांमध्ये वणी, सप्तश्रुंगी, मार्कंडा, रवळया-जवळया, कंचना आणी धोडप किल्ले येतात.
रान किडा ....
Travel...It Keeps Me Alive
रान किडा ....
August 17, 2016
June 17, 2016
प्रकाश-शलाखा- भंडारदर्याचा काजवा मोहोत्सव
वैशाख वणवा आपल्या अस्तित्वाचा दाखला पाना-फुलांवर, दगड धोंड्यांवर, पाला पाचोळ्यावर इतकेच काय तर गुरा-वासरांसहीत माणसाच्या चेहर्यावरही देत असतो. निसर्गाच्या प्रत्तेक घटकाला माहीत असतं, रात्री नंतर दिवस उजाडणारच आहे, फक्त रात्रीचा अंधार जायची वाट पहायची आहे. आपली सहनशीलता उजाडेपर्यंत शाबूत ठेवायची आहे. वैशाख वणव्यानंतरच जेष्ठातल्या पावसाळ्याचे आगमन होणार, त्यासाठी सृष्टी झपाटल्यासारखी पावसाची वाट पाहात असते. येणारा पाऊस आपल्या सोबत पाण्याबरोबरच उत्साह, आनंद आपल्याला मुक्तहस्ते भरभरून देणार असतो. झाडांच्या पानांवर साचलेली निराशेची धूळ एका क्षणात झटकून त्यांना नवाकोरा हिरवा शालू भेट देणार असतो.
Labels:
Akole,
Bhandardara,
Fire-Flies,
Kajava,
Kajave,
काजवा
April 06, 2016
शेतकरी हा आमचा बाप आहे.
बापानं पोरांना जेवू घातलं नाही तर पोरं खाणार काय याचा तरी विचार करा. याच बापावर जेव्हा एखादा मस्तवाल मंत्री "जा मर आत्महत्या कर" म्हणतो तेव्हा तळपायाची आग मस्तकात का जाऊ नये.
याच शेतकर्यांकडे "आपल्या पोरांची लग्न करण्या साठी पैसा आहे आणि आता गळे काढायला काय झालं" म्हणनार्यांच्या ढुंगंनावर सणसणीत लाथ मारावीशी वाटते. अरे तुम्ही आपल्या पोरांच्या लग्नावर श्रीखंड पुरीचे बेत झोडा आणि शेतकर्यांनी आपल्या पोराबाळांची लग्न केली की तुमच्या नाकाला मिरची झोंबते. अरे तुमची आहे प्रतिष्ठा आणि यांची पोरं काय रस्त्यावर पडली आहेत. किती रे नीच झालात.
October 20, 2015
रतनगड - एक स्ट्रेस बस्टर ( Ratangad )
रतनगड - एक स्ट्रेस बस्टर
प्रवरा नदीचे उगमस्थान असलेला हा गड, येथले घनदाट
जंगल अजूनही वन्य प्राणी / पक्षांनी समृद्ध आहे. भंडारदरा धरणाच्या साठ्या मुळे
सुपीक असलेला हा प्रदेश. धरणाच्या चोहो बाजूने एक समृद्ध जंगल तयार झाले आहे. या
जंगलात बिबळे, भेकरे, सायाळी, तरस, लांडगे, मोर, रानडुकरे, कोल्हे, रानमांजरी, वानर, माकडे, ससे आहेत.
October 15, 2015
September 20, 2015
फुफाटा
कधीपासून बबन्या फुफाट्याकडं नीस्ता
एकुलग्यावानी पघत बसला व्हता. दोन घटका व्हून गेल्या, पर ह्यो काय बुडाखालचा दगुड
सोडाया तयार न्हायी. ऐन पानकाळ्यात फुफाट्यासगट वावटळी धुडगूस घालत्याल तर जीवाला
घोर लागून ऱ्हायचाच.
वरीसभरापासूनचा काळ नदरं म्होरून घसारला.
तसा गाव कधीबी दुष्काळाचा बाधी न्हवता, तीन वरसापासून व्हत्याचं न्हवतं झालं. एक
पीक हाताला घावलं नाय. मागल्या पानकाळ्यात तांबटाचा फड लय रगाट निघाला, अशी मोठाली
तांबटं येका मुठीमंदीबी नाय घावायची. मोठ्या कवतीकानं जाळ्या भरूभरू तांबटं मार्केटात आनी
गुजरीला पाठवून दिली. ऐनवक्ताला बाजार असा काय उठला की चार वरसात एव्हडा कमी भाव
नाय पघितला. समदा बाजार लालभडक दिसाया लागला व्हता, सारा फड उखुड्य़ाचा धनी झाला. त्याच
येळी दीड यकरात उसाचा फड धरला व्हता, उनकाळ्यातसुधा हिरीचं पानी पुरूनपुरून उस
जगावला आनी उनकाळ्याच्या शेवटाला आभाळाचं प्वाट फाटलं, धडाधड पांढुरक्या गारा पडाय
लागल्या. समदा उसाचा फड दिसात आडवा झाला, पर म्हणायला उंदरांची मातुर जत्रा साजरी
झाली.
August 10, 2015
Gorakhgad Trek - गोरखगड
गोरखगड-
तारीख
: ८ ऑगस्ट २०१५
किल्ले गोरखगड, काढली
बाईक आणी निघालोना बुंगाट. तसा जवळच पण आडवळणावरचा किल्ला.
म्हणूनच राहिला होता खूप दिवसांपासून. हो-नाही करता करता दोघेच राहिलो नेहमीचे
पंटर. कर्जत वरून “म्हसा” या गावी पोहोचून दहेरी गावात पोहोचावे लागते. गावातून थोडा
मागे येवून मंदिरामागून एक पाउलवाट जंगलात शिरते. तसा लोकांच्या जास्त माहितीतला
नाहीये हा गड, म्हणूनच इतर गड/किल्ल्या पेक्षा वर्दळ कमी आहे गोरखगडावर.
हा
भाग तसा भीमाशंकरच्या अभायाराण्याचाच भाग आहे. मच्छिंद्रगड, गोरखगड हे शेजारी
शेजारी आहेत. गोरखगड म्हणजे नाथसंप्रदायातल्या गोरक्षनाथांच्या साधनेची जागा.
सिद्धगड, गोरक्षगड आणी मच्छिंद्रगड असा आवडता ट्रेक करणारे खूप ट्रेकर्स आहेत. आधी
सिद्धगड करून जंगलातून धबधब्यांचा आनंद घेत गोरखगडावर पोहोचायचं, तेथेच मुक्काम
करून मग गोरखगडावर मार्गक्रमण करून माचीन्द्रगडावर निघायचं, असा हौशी
गिर्यारोहकांचा मार्ग असतो. गोरक्षगड आणी मच्छिंद्रगडाच्या सुळक्यांमुळे तसा हा
हाडाच्या गिर्यारोहकांसाठी हवाहवासा ट्रेक आहे.
Subscribe to:
Posts (Atom)