गडवाटकरी

गोरखगड- (Gorakhgad)
भीमाशंकर डोंगररांग – ठाणे
उंची - २१३७ फूट
 तारीख : ८ ऑगस्ट २०१५

हा भाग तसा भीमाशंकरच्या अभायाराण्याचाच भाग आहे. मच्छिंद्रगड, गोरखगड हे शेजारी शेजारी आहेत. गोरखगड म्हणजे नाथसंप्रदायातल्या गोरक्षनाथांच्या साधनेची जागा. गोराक्षगड आणी मच्छिंद्रगडाच्या सुळक्यांमुळे तसा हा हाडाच्या गिर्यारोहकांसाठी हवाहवासा ट्रेक आहे. कर्जत वरून “म्हसा” या गावी पोहोचून दहेरी गावात पोहोचावे लागते. गावातून थोडा मागे येवून मंदिरामागून एक पाउलवाट जंगलात शिरते. सुळक्या खाली एक पुरातन शिवमंदिराचे अवशेज लागतात. एक पिंडी आणी तीन मोठे सपाट ताशीव दगड आहेत तिथे. आजूबाजूचे दगड पुरातन मंदिराच्या अस्थित्वाची साक्ष देतात अजूनही. समोरच वरच्या बाजूला गडाचा दरवाजा आहे. वर गेल्यावर पायऱ्या उतरून समोरच प्राचीन अतिभव्य गुहा लागते. ही गुहा गोरखगडाच्या सुळक्यामध्ये अगदी मधोमध कोरली आहे. आरामात १०० एक लोक राहू शकतात ह्या गुहेत. गुहेच्या बाजूला पाण्याची तीन टाकी आहेत, पण गुहेच्या डाव्या बाजूला असलेल्या टाक्यातील पाणीच फक्त पिण्यायोग्य आहे. गुहेच्या डाव्या बाजूने पाण्याच्या टाक्या पार करून पुढे निघालं कि एक लोखंडाची शिडी लागते. तेथून वर जवळपास ५० कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. जरा जपूनच त्या पार कराव्यात. ह्या पायऱ्या चढून गेल्यावर, वर एक शीवमंदिर आणी त्या पुढे एक नंदी आहे बाजूलाच गोरखनाथांची समाधी आहे. गडाचा माथा फारच लहान आहे कदाचीत ह्या गडाचा उपयोग फक्त आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठीच होत असावा.



रतनगड – (Ratangad)
कळसूबाई डोंगर रांग - अकोले (अहमदनगर )
उंची ४२५५ फूट




प्रवरा नदीचे उगमस्थान असलेला हा गड, येथले घनदाट जंगल अजूनही वन्य प्राणी / पक्षांनी समृद्ध आहे. भंडारदरा धरणाच्या साठ्या मुळे सुपीक असलेला हा प्रदेश. धरणाच्या चोहो बाजूने एक समृद्ध जंगल तयार झाले आहे. रतनगडाच्या पायथ्याशी अमृतेश्वर महादेवाचे एक हेमाडपंती, १२०० वर्षां पूर्वीचे मंदिर, यादवकालीन स्थापत्यशास्त्राची आठवण करून देते. एक अप्रतीम स्थापत्यशास्त्राचा नमुना. ह्या मंदिराच्या प्रवेशद्वारा वर समुद्र मंथनाचे शिल्प कोरलेले आहे त्याचा एक वेगळाच अर्थ मला प्रवरेचे gazetteer चाळत असताना लागला,  नक्की वाचा ते. तेथील पुष्करणी  ही फारच विलोभनीय आहे. पुष्करणी ही अजून फारच चांगल्या अवस्थे मध्ये आहे, सभोवती पायऱ्यांचा घाट आहे एक गजाननाचे शिल्प आणी चारही बाजूंना विष्णूच्या शिल्पकृती दगडात कोरलेल्या आहेत. प्रत्तेक मूर्तीच्या वर एक उत्तम कोरीवकाम केलेला घुमट आहे.
तर रतनगड हा फार प्राचीन गड आहे जो आजूबाजूच्या विस्तीर्ण पठारावर, कोकणावर नजर ठेवण्यासाठी त्याच्या भौगोलीक स्थानामुळे महत्वाचा होता. 
१७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.


अलंगमदन व कुलंग
कळसूबाई डोंगर रांग - अकोले (अहमदनगर )
अलंग ऊंची - ४५०० फूट
मदन ऊंची - ४८५२ फूट
कुलंग ऊंची - ४८२२ फूट
अलंगमदन व कुलंग गड हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुकयात सह्याद्री पर्वताच्या उत्तर डोंगररांगांत आहेत. प्रवरानदी, रतनगड आणी अलंग डोंगररांगांतच उगम पावते. तसा अलंगमदन आणी कुलंग गडाचा इतिहास कुणालाच ज्ञात नाही.
इतिहासा बद्दल थोडेसे 
प्राचीन काळात घाटरस्त्यांनी होणारे दळणवळण कोकणातील बंदरांमधून घाटावर होत असे. असेच खूप जुनेघाट सह्याद्रिरांगां मध्ये होते आणी अजूनही आहेत. महत्वाचे व्यापारी केंद्र हे जुन्नरपैठण आणी नाशिक होते. प्राचीन काळापासून या प्रदेशात होणारे व्यापारी दळणवळण पैठण-जुन्नरपैठण-नाशिकनाशिक-नगरनाशिक-पुणे-मुंबईमुंबई-नगर हे गोदावरी आणी प्रवरेच्या सुपीक प्रदेशातच उदयाला आले आणी त्या साठी व्यापारीमार्गही तयार झाले. पारनेरभंडारदराइगतपुरी कल्याण हा राजमार्ग होता. येथून कलकत्यापर्यंत माल जात असे. नेवासे ते रतनगड हा महामार्ग त्याकाळात महत्वाचा होताअकोलेसंगमनेर आणी सिन्नर ह्या मार्गावरचे महत्वाचे थांबे होते. याच मार्गावर भव्य शिवमंदिरे आणी बाजारपेठा याची पाऊलखुणा देतात.
सातवाहन काळापासूनच हे राजमार्ग प्रचलित होते. यादवांच्या काळातमात्र या परीसारला पुन्हाएकदा चांगले दिवस आले. रतनगडअलंगमदन आणी कुलंग गड यादवांच्या काळातच निर्माण झाले. यादवांच्या साम्राज्यात संपत्तीची मोठ्या प्रमाणावर वाढ असल्याने संरक्षणाची गरज निर्माण झाली आणी त्यासाठी व्यापारीमार्गांचे संरक्षण हया दुर्ग आणी गडांवरून होत असे.
या परिसरात दुर्गांचे महत्व शिवकाळात वाढले. राजांनी गडांचे व्यवस्थापन आणी सुरक्षेची जबाबदारी स्थानिक महादेवकोळी आणी आदिवासी जमातीवर टाकली. इंग्रज अम्मल येईपर्यंत या व्यवस्थेत बदल झाला नाही. मराठ्यांची शक्ति ही गडावर असल्यामुळे इंग्रजांनी त्यांचा अम्मल येताच हेतुपूर्वक गडांची नासधूस केली. ह्याचे सगळ्यात जास्त परिणाम अलंग आणी मदनगडांना भोगावे लागले. 
इंग्रजांनी यात बदलकरताच याचे पडसाद स्थानिक जमातींमध्ये उमटले. इंग्रजांनी दुर्ग जिंकून स्थानिकांच्या परंपरागत हक्कांवर गदा आणली. जुन्नर येथे काळा चबुतरा याच आदिवासी लढ्याची आठवण करून देतो. महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेविरुध्ह लढ्याचा आरंभ आदिवासी लढ्यापासून आणी तोही प्रवारा खोर्‍या पासून सुरू झाला. १८१८ साली महादेवकोळी आणी भील्ल जमातीने पहिला लढा स्वत:च्या हक्कांसाठी उभारला. या लढ्याचे नेतृत्व रामजी भांगरे आणी रामा किरवा यांनी केले. रामजी भांगरे याने इंग्रजांविरुद्ध जोरदार उठाव केला. नेहमी प्रमाणे फितुरीचा शाप या लढ्यालाही लागला आणी शेवटपर्यंत अपयशी ठरला. पुढे हा वारसा भागोजी नाईकाने सुरू ठेवला.


No comments: