अलंगगड, मदनगड, कुलंगगड |
अलंग, मदन व कुलंग गड हे अहमदनगर
जिल्ह्यातील अकोले तालुकयात सह्याद्री पर्वताच्या उत्तर डोंगररांगांत आहेत. प्रवरानदी, रतनगड आणी अलंग
डोंगररांगांतच उगम पावते. तसा अलंग, मदन आणी कुलंग गडाचा इतिहास कुणालाच ज्ञात नाही.
इतिहासा बद्दल थोडेसे
प्राचीन काळात घाटरस्त्यांनी
होणारे दळणवळण कोकणातील बंदरांमधून घाटावर होत असे. असेच खूप जुनेघाट
सह्याद्रिरांगां मध्ये होते आणी अजूनही आहेत. महत्वाचे व्यापारी केंद्र हे जुन्नर, पैठण आणी नाशिक होते. प्राचीन काळापासून या प्रदेशात होणारे व्यापारी दळणवळण पैठण-जुन्नर, पैठण-नाशिक, नाशिक-नगर, नाशिक-पुणे-मुंबई, मुंबई-नगर हे गोदावरी आणी प्रवरेच्या सुपीक प्रदेशातच
उदयाला आले आणी त्या साठी व्यापारीमार्गही तयार झाले. पारनेर, भंडारदरा, इगतपुरी कल्याण हा राजमार्ग होता. येथून कलकत्यापर्यंत माल
जात असे. नेवासे ते रतनगड हा महामार्ग त्याकाळात महत्वाचा होता, अकोले, संगमनेर आणी सिन्नर ह्या मार्गावरचे महत्वाचे थांबे होते.
याच मार्गावर भव्य शिवमंदिरे आणी बाजारपेठा याची पाऊलखुणा देतात.
सातवाहन काळापासूनच हे राजमार्ग
प्रचलित होते. यादवांच्या काळातमात्र या परीसारला पुन्हाएकदा चांगले दिवस आले.
रतनगड, अलंग, मदन आणी कुलंग गड यादवांच्या काळातच निर्माण झाले. यादवांच्या साम्राज्यात
संपत्तीची मोठ्या प्रमाणावर वाढ असल्याने संरक्षणाची गरज निर्माण झाली आणी त्यासाठी
व्यापारीमार्गांचे संरक्षण हया दुर्ग आणी गडांवरून होत असे.
या परिसरात दुर्गांचे महत्व
शिवकाळात वाढले. राजांनी गडांचे व्यवस्थापन आणी सुरक्षेची जबाबदारी स्थानिक
महादेवकोळी आणी आदिवासी जमातीवर टाकली. इंग्रज अम्मल येईपर्यंत या व्यवस्थेत बदल
झाला नाही. मराठ्यांची
शक्ति ही गडावर असल्यामुळे इंग्रजांनी त्यांचा अम्मल येताच हेतुपूर्वक गडांची
नासधूस केली. ह्याचे सगळ्यात जास्त परिणाम अलंग आणी मदनगडांना भोगावे लागले.
इंग्रजांनी यात बदलकरताच याचे
पडसाद स्थानिक जमातींमध्ये उमटले. इंग्रजांनी दुर्ग जिंकून स्थानिकांच्या परंपरागत
हक्कांवर गदा आणली. जुन्नर येथे काळा चबुतरा याच आदिवासी लढ्याची आठवण करून देतो. महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेविरुध्ह
लढ्याचा आरंभ आदिवासी लढ्यापासून आणी तोही प्रवारा खोर्या पासून सुरू झाला. १८१८ साली महादेवकोळी आणी भील्ल जमातीने पहिला लढा स्वत:च्या
हक्कांसाठी उभारला. या लढ्याचे नेतृत्व रामजी भांगरे आणी रामा किरवा यांनी केले.
रामजी भांगरे याने इंग्रजांविरुद्ध जोरदार उठाव केला. नेहमी प्रमाणे फितुरीचा शाप
या लढ्यालाही लागला आणी शेवटपर्यंत अपयशी ठरला. पुढे हा वारसा भागोजी नाईकाने सुरू
ठेवला.
अलंगगडा च्या मार्गावरील शिल्प |
कोणत्याही organiser/group शिवाय गिर्यारोहणासाठी निघण्यावर आमचाभर असतो.
परंतू अशावेळी कमीतकमी साधनसामग्री घेतलेली बरी आणी जास्तीतजास्त वेळ हा व्यवस्थापनावर घालवण्याची
तयारी हवी. ह्या गोष्टीचा फायदा एव्हडाच की आपल्या मर्जीनूसार आणी आवडीनूसार वेळ
घालवण्याचं स्वातंत्र्य. अलंगच्या रॉकपॅच साठी कमीतकमी बेसिक rock climbing चे साहित्य असणे
गरजेचं आहे. आमच्याकडे ४० Ft rope होती
परंतू ती पुरेशी नव्हती शेवटी वैभवने आपल्या ओळखीने १०० ft rope आणी दोन caliper ची व्यवस्था केली.
harness तर आमच्याकडे
होतीच. मी, वैभव, अभिजीत, दादा आणी सुरेश दादा
एव्हडे जणं तयार होतो.
अलंगगड, मदनगड, कुलंगगड तीन
मार्गाने करता येतो. अलंगवाडी किंवा कुलंगवाडी किंवा घाटघर मार्गे. आम्ही अलंगवाडी वरून
सुरुवात करून कुलंगवाडी वरून परतणार होतो. आधी मदन, त्या नंतर अलंग आणी शेवटी कुलंग करणार होतो. ह्या ट्रेक साठी
एखादा वाटाड्या घेण गरजेचं आहे, कारण
येथल्या पायवाटा नवख्या माणसांना गोंधळवून टाकतात. अलंगच्या पोटातून जाणारा मार्ग
हा घनदाट झाडांमधून आणी कार्वी च्या जंगलातून जातो. काहीवेळा तर रास्ता चूकण्याचीच शक्यता जास्त.
अलंगगडाच्या रस्त्याने मदनगडाच्या मार्गावर |
मदनगडा वरील उभी खडकाची चढण |
तिथून पुढे पुन्हा दरीच्या बाजूने अरुंद पायवाटेने कड्याला अर्धी
प्रदक्षिणा घालून पुन्हा अलंगच्या दिशेने चालल्यावर दगडात कोरलेल्या अप्रतिम पायर्या
लागतात. अप्रतिम शाब्दही कमी आहे या कलाकारीला. फक्त छिन्नी आणी हातोड्याने हे
अव्हगड काम अज्ञात कलाकारांनी करून ठेवला आहे. तेथेच गडाची भग्न अवस्थेतील कमानही गत वैभवाची साक्ष देत उभी आहे. आजच्या इंजिनीर्सना सुद्धा
प्रगतसाधनांनी अशी कामं करताना घाम फुटावा.
वर फक्त काही पाण्याची टाकी आणी एक गूहा आहे. पाण्याची टाकी आताच साफ
केल्यामुळे स्वच्छ: पाण्याचा पुरेसा स्रोत मदनवर आहे. पण
पावसाळ्या नंतर जाताना सरपटणार्या प्राण्यांपासून जरा सांभाळूनच येथे जावं. एका
अजगरानेही आम्हाला दर्शन दिले. मागच्याच महिन्यात कास च्या पठाराला भेट दिली होती, तिथे जेव्हड्या प्रकारची फूलं पाहायला मिळतात ती सर्व आम्हाला येथे पाहायला मिळत होती. फक्त फरक एव्हडाच आहे की कासला पोहोचनं सर्वांना सोपं आहे आणी हा भाग काहीसा दुर्गम आहे.
मदनगडा वरून अलंगगड |
त्यानंतर मादनगडावरून अलंग कडे मोर्चा वळवला. वैभवने रॅपलिंगची टेकनीक
सांगितली त्या प्रमाणे सर्वजण पटापट मदनचा कातळकडा उतरून परतीला लागले.
आता अलंगकडे कूच केली. पुन्हा मदन उतरून अलंग-मदन च्या खिंडीत आलो तिथूनच
परत अलंगच्या बाजूने १५ मिनिट चालत मागच्या बाजूला आलो. मदनकडे जातानाच आम्ही
अलंगची वाट पहिली होती. जेथून अलंग च्या पायर्या सुरू होतता तिथेच उजव्या बाजूला
खडकात एक गुहा कोरलेली आहे. आम्ही पोहोचेपर्यंत आधीच एक ग्रुप पायर्या चढत होता.
१५ ft चा एक पॅच चढायला यांना
जवळ जवळ अर्धा तास लागला. तेव्हड्या वेळात आम्ही पोटपुजा उरकून घेतली. १० मिनिटा
मध्ये तो पॅच चढून आम्ही अलंगच्या (४५-५० Ft) सुप्रसिद्ध
कातळकड्या खाली येवून पोहोचलो.
मदनच्या चढाई नंतर आम्हालाही हुरूप आला होता परंतु आधीच्या ग्रुप्सने
लावलेल्या रोपने आम्ही आधी आमचा रोप फिक्स करून घेतला. आता फक्त सुरक्षेसाठी रोप
वापरुन आम्ही कातळावर चढाई करणार होतो. रोपचं दूसरा टोक खाली मी आणी वैभवने हातात
ठेवून सगळ्यांना वरजाऊ दिले आणी नंतर आमचं सामान वर पाठवून आम्हीही वर पोहोचलो. हा
पॅच चढून गेल्यावर एक गुहा लागते तेथून पुढे कातळातल्या पायर्या चढून गेल्यावर
आपण अलंगवर पोहोचतो. ह्या पायर्या थोड्या काळजीपूर्वकच चढाव्या लागतात कारण फारच
अरुंद आहेत आणी खाली खोल दरी आहे.
वर पोहोचल्यावर खरच खूप सुंदर दृष्य नजरेत
भरले, जणूकाही आम्ही ढगांमध्येच पोहोचलो होतो. एक शीवाची भग्न पिंड आहे आणी तीला
दगडांचा आडोसा तयार केला आहे. वरच्या फोटोमध्ये जे दगड दिसतात तेथेच ही पिंड आहे.
ऊन-पावसाचा मारा सहन करून नंदितर ओळखूयेण्याच्या पलीकडे पोहोचला आहे.
सरळ पुढे गेल्यावर समोरच्या डोंगरात
काही गुहा कोरलेल्या आहेत तेथेच आज आमचा मुक्काम होणार होता. आम्ही पटापट सामान
वैगरे गुहेत ठेवून गड पाहायला बाहेर पडलो. वरच्या बाजूला काही वाड्याचे आणी
पाण्याचे टाक्यांचे अवशेष आहेत. फारच सुंदर काम केलं आहे आपल्या पूर्वजांनी, आणी तेही प्रगत
साधनांशीवाय.
आता पाऊस सुरू झाला होता धुक्यामुळे काही
दिसतही नव्हतं म्हणून आम्ही परत गुहेकडे परतलो. घरून आणलेल्या चपात्या, चटणी आणी
कांदा, वा काय
मस्त बेत होता, सापाटून भूक लागली होती, सर्वांनी संध्याकाळी ७ वाजताच मस्त हात मारला. भूक लागल्यावर आम्हाला जेवण
पंचपक्वानाहून गोड लागले. अभिजीत, दादा आणी सुरेश दादा मस्त
चादरीत स्वता:ला :गुंडाळून झोपले. वैभव आणी मी बाहेर थंडीत कुडकुडत होतो. मग
पायाजवळ शेकोटी करून झोपलो आम्ही. एव्हडया लवकर झोपल्यावर साहजिकच होता की लवकर
जाग येणार. रात्री १:३० वाजताच जाग आली आता थंडी पण जाणवू लागली होती. मग वैभवने
तीन दगडांची चूल बनवली आणी टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं. पाणी उकळायला
२:३० वाजले मग कुठे ३ वाजता नूडल्स तयार झाल्या. सगळ्यांना भूक लागलीच होती,
मस्त ताव मारला गरमागरम नूडल्स वर. थंडी मग कुठल्या कुठे पाळली.
सकाळचं दृष्य खरच सुंदर होता, फोटो वरुन सुद्धा तुम्हाला
कळेल, पण आमच्याकडे एव्हडा वेळ नव्हता. म्हणून समानाची
बांधाबांध करून कुलंग वर जाण्यासाठि निघालो आम्ही.
परत तो रॉकपॅच उतरून आम्ही अलंग-मदन च्या
खिंडीत पोहोचलो. तेथूनच एक वाट खाली जाते, ती पकडून चालायला लागलो. कार्वी च्या
जंगलातून जाते ही वाट, कुलंग वर पोहोचायला ३ तास लागले. कुलंग वरही काही वाड्यांचे भग्न अवशेष,
खूप सारी पाण्याची टाकी आहेत. अलंग आणी मदन पेक्षा कुलंग हा
भाग्यशाली आहे. इंग्रजांनी याची नासधूस केलेली नाही. कुलंग च्या पायर्या अजूनही
चांगल्या प्रकारे शाबूत आहेत फक्त चढण उभी पोटावर येणारी आहे. कुलंग पाहून आम्ही
तसेच परतीच्या प्रवासाला लागलो.
कुलंगगडा कडे कूच |
No comments:
Post a Comment