ब्लॉग प्रपंच कशा साठी ?, मला पण पडलाय हो प्रश्न.
तेच तर शोधायचं आहे मित्रांनो.
असाच कधीतरी, कुठेतरी, जवळचं, लांबचं, आवडीचं, नावडतं, कळलेलं, नकळलेलं व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे हा ब्लॉग, असा काहीसा सोयीस्कर अर्थ काढलाय मी. मी आपला साधारण मनुष्य, संवेदना जागृत असलेली आणि चारचौघांसारखेच साधेसे आयुष्य जगणारी एक व्यक्ती. पण प्रत्तेकाचा आयुष्याचा एक लखः आणी अंधारा कोपरा असतोच ना मित्रांनो, तसाच माझा पण आहे. त्या बद्दलच मी इथे लिहिणार आहे.
म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुल्ही, तसाच काहीसं आपल्या सगळ्यांचे अनुभव थोडयाफार फरकाने सारखेच असतात असा काहीसा माझा मत.
तसा मी व्यवसायाने Mechanical engineer आहे आणी मला भटकायची अतीशय आवड आहे. ह्या भटकंतीत खूप काही मिळालं, अनुभवांच्या, आठवणींच्या आणी माणसांच्या रुपात. तसाच एक हौशी छायाचित्रकार सुद्धा आहे मी. मला आवडलेले काही फोटो हि मी तुम्हाला येथेच दाखवेन. अथांग निळा समुद्र, घनदाट जंगल, सोसाट्याचा वारा, सकाळचा प्रसन्न सूर्य, शीतल चंद्रमा या सगळ्यांत मला चैतन्य जाणवतं.
त्याच अनुभवांची आणि त्यातुन आलेल्या शहाणपणाची ही उजळणी म्हणुन हा सगळा लेखनाचा घाट…..

"Travel...It Keeps Me Alive"
1 comment:
Apratim
Post a Comment