हरीश्चंद्राच्या
वाऱ्या तशा आधीही
झाल्यात, कधी खिरेश्वर
तर कधी पाचनयी
वरून. प्रत्येक वेळी
त्याच सौंदर्य मनाला भारून
टाकणारं. पावसानं चिंब भिजलेल्या काळ्या पाषाणाचं मंदिर, ओलेत्या अंगानं आणि
शेवाळाच्या संगतीने निळ्याशार आकाशाच्या
background वर खरंच खूप
सुंदर दिसतं. हिवाळ्यात
थंडीच्या कडाक्यात, धुक्यात हरवलेलं
मंदिर शोधताना खरी
गंमत अनुभवायला मिळते.
पण एव्हडं असूनही कोकणकडा आणि तिथून
दिसणारा नजारा नजरेत साठवता आला
नव्हता कधी. कधी
कोकणकडा ओलेत्या अंगाने व
ढगांची चादर पांघरून
बसलेला, तर कधी
कडाक्याच्या थंडीत धुक्याची दुलई
घेवून निजलेला पाहिलाय
मी. पावसाळ्यात सरींना सोबत घेवून
येणारा आद्र वारा
आणि थंडीत गारठवणाऱ्या
धुक्यातला लपंडाव, हे सारं एकदा तरी अनुभवणं
म्हणजेच माझ्या
लेखी स्वर्ग.