August 17, 2016

Dhodap Fort - बलदंड-बेलाग किल्ले धोड़प

बलदंड-बेलाग किल्ले धोड़प- Dhodap Fort 

किल्ले धोड़प- हा महाराष्ट्रातील दूसरा सागळ्यात उंच किल्ला. उंच क़िल्ल्याचा मान हा साल्हेर क़िल्ल्याचा आहे. योगायोगाने दोन्ही किल्ले हे नाशीक जील्हयातच आहेत. नाशीक मधल्या कळवण तालूक्यात धोड़प किल्ला येतो. धोड़पची उंची समुद्र सपाटी पासुन ४८२९ फूट आहे. नाशीक मध्ये त्र्यंबकेश्वर, सातमाळ आणी बागलाण या सह्याद्रीच्या मुख्य डोंगररांगा व अजंठा-सातमाळ, बालाघाट या उपडोंगररांगा आहेत. त्यापैकि अजंठा-सातमाळ डोंगररांगेत हा किल्ला वसला आहे. या रांगांमध्ये वणी, सप्तश्रुंगी, मार्कंडा, रवळया-जवळया, कंचना आणी धोडप किल्ले येतात. 

June 17, 2016

प्रकाश-शलाखा- भंडारदर्‍याचा काजवा मोहोत्सव

वैशाख वणवा आपल्या अस्तित्वाचा दाखला पाना-फुलांवरदगड धोंड्यांवरपाला पाचोळ्यावर इतकेच काय तर गुरा-वासरांसहीत माणसाच्या चेहर्‍यावरही देत असतो. निसर्गाच्या प्रत्तेक घटकाला माहीत असतंरात्री नंतर दिवस उजाडणारच आहेफक्त रात्रीचा अंधार जायची वाट पहायची आहे. आपली सहनशीलता उजाडेपर्यंत शाबूत ठेवायची आहे. वैशाख वणव्यानंतरच जेष्ठातल्या पावसाळ्याचे आगमन होणारत्यासाठी सृष्टी झपाटल्यासारखी पावसाची वाट पाहात असते. येणारा पाऊस आपल्या सोबत पाण्याबरोबरच उत्साहआनंद आपल्याला मुक्तहस्ते भरभरून देणार असतो. झाडांच्या पानांवर साचलेली निराशेची धूळ एका क्षणात झटकून त्यांना नवाकोरा हिरवा शालू भेट देणार असतो.

April 06, 2016

शेतकरी हा आमचा बाप आहे.

बापानं पोरांना जेवू घातलं नाही तर पोरं खाणार काय याचा तरी विचार करा. याच बापावर जेव्हा एखादा मस्तवाल मंत्री "जा मर आत्महत्या कर" म्हणतो तेव्हा तळपायाची आग मस्तकात का जाऊ नये.
याच शेतकर्‍यांकडे "आपल्या पोरांची लग्न करण्या साठी पैसा आहे आणि आता गळे काढायला काय झालं" म्हणनार्‍यांच्या  ढुंगंनावर सणसणीत लाथ मारावीशी वाटते. अरे तुम्ही आपल्या पोरांच्या लग्नावर श्रीखंड पुरीचे बेत झोडा आणि शेतकर्‍यांनी आपल्या पोराबाळांची लग्न केली की तुमच्या नाकाला मिरची झोंबते. अरे तुमची आहे प्रतिष्ठा आणि यांची पोरं काय रस्त्यावर पडली आहेत. किती रे नीच झालात.